कासेगाव/संजय पवार : संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अतंरवाली सराठी या गावी मनोज जरांगे-पाटील या संघर्ष योध्द्याने आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर येथील मराठा सेवा संघाचे प्रा. संजय जाधव, प्रा. जीवन यादव, प्रा. गणेश निळ, प्रा. सखाराम साठे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा बांधव जरांगे-पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक पाठिंबा देण्यासाठी एकत्र येत आहेत, परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही, यामुळे खरी आरक्षणाची गरज आहे, अशा हृदयस्पर्शी शब्दात सोलापूरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित संपूर्ण शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देण्यासाठी आले असल्याचे सांगितले.
यावेळी विकास लक्के, सुरेश जाधव, नागेश निळ, गंगाधर डोके, तानाजी भोसले, यांच्यासह अनेक जणांनी सहभाग घेतला होता.