बडोदा बँक कर्मचारी संघटनेचे माजी महासचिव जयंत दर्शने यांचे निधन

shivrajya patra
पंढरपूर : महाराष्ट्र रिजन बडोदा बँक कर्मचारी संघटनेचे माजी महासचिव जयंत गंगाधर दर्शने (वय- ६८ वर्षे, पंढरपूर) यांचे सोमवारी, दुपारी पुणे येथी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. राज्य संघटनेचे महासचिव नात्याने त्यांनी पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा, नागपूर, औरंगाबाद विभागात आपल्या मैत्रीपूर्ण स्वभावाने तितक्याच आग्रही विषय मांडणीमुळे लोकप्रियता मिळवली होती.

जयंत दर्शने यांनी बडोदा बँक पंढरपूर शाखेचे ग्राहकांसाठी विश्वासक दुवा असा लौकिक मिळवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
To Top