कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम

shivrajya patra

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी सिद्धेश्वर प्रशालेच्या इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांनी कर्मयोगी अप्पासाहेबांनी उभारलेल्या लोककल्याणकारी अनेक संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था म्हणजे दै.संचार. या प्रेसला भेट देऊन अभिनव उपक्रम सप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफले . या सदिच्छा भेटीच्या उपक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दैनिक संचारच्या प्रेसमध्ये प्रवेश करताच  मुख्य दालनात असलेल्या दै. संचारचे मुख्य संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी व कै. रंगाण्णा वैद्य यांच्या पुतळ्यास प्रशालेचे उपमुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यानंतर  विद्यार्थ्यांनी प्रेसमधील संगणक विभागास भेट दिली. त्याठिकाणी महादेव आवारे (उपसंपादक) यांनी विविध वार्ताहरांकडून संकलित केलेल्या बातम्या, ई - मेलद्वारे  येणाऱ्या बातम्या यांचे संकलन, दुरुस्ती व वर्तमानपत्राच्या भाषेत रूपांतर ही कामे या विभागाद्वारे कशा पद्धतीने केल्या जातात, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. 
छपाई विभागाचे व्यवस्थापक प्रदीप उमरजीकर हे बोलताना म्हणाले की, हा विभाग रात्री १ ते ३ वाजेपर्यंत ७ कामगारांच्या मदतीने निरंतर चालतो तसेच वर्तमानपत्र छपाईसाठी  वापरला जाणारा कलर पेपर, त्यासाठी वापरात येणारी शाई याविषयीं माहिती दिली. प्रशांत जोशी ( वृत्तसंपादक, संपादकीय विभाग ) यांनी माहिती देताना असे सांगितले की, दैनिक 'संचार' ची स्थापना, १३ ऑक्टोबर १९६१ रोजी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी व कै. रंगाण्णा वैद्य यांनी केली. तसेच दैनिक संचारच्या स्थापनेमागील उद्देश, त्याचे महत्त्व त्यांनी विशद करत विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचण्याचे महत्त्व पटवून दिले. 

या वेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे तसेच सहशिक्षक निलेश दंतकाळे व लक्ष्मण गुरव आदी उपस्थित होते.

To Top