निवासी उप जिल्हाधिकारी शमा ढोक-पवार एकतर्फी कार्यमुक्त पर्यटन संचालनालय, पुणे येथे उप संचालकपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती

shivrajya patra

सोलापूर : राज्य शासनाने निवासी उप जिल्हाधिकारी शमा ढोक-पवार यांच्या बदलीचे आदेश गुरूवारी, १४ सप्टेंबर रोजी जारी केले. श्रीमती शमा ढोक-पवार यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर दादासाहेब कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमती शमा ढोक-पवार यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. त्यांची पर्यटन संचालनालय, पुणे येथे उप संचालक, या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (५) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम ४० मधील परिशिष्ट - २ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्रीमती शमा ढोक-पवार, निवासी उप जिल्हाधिकारी, सोलापूर यांची उप संचालक, पर्यटन संचालनालय, पुणे या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.
सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्रीमती शमा ढोक पवार, उप जिल्हाधिकारी यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी त्या धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे.

त्यांची पर्यटन संचालनालय, पुणे येथे उप संचालक, या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.

श्रीमती शमा ढोक-पवार, उप जिल्हाधिकारी यांनी प्रधान सचिव, पर्यटन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे तात्काळ हजर व्हावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

To Top