कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी भारतीय जैन संघटनेच्या वतीने अभिवादन

shivrajya patra
सोलापूर : 
सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास अहिंसा गोशाळेचे संचालक हर्षलभाई कोठारी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे, जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने, जिल्हा सदस्य विक्रांत बशेट्टी, जैन कासार समाजाचे संचालक संजय गडदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हर्षलभाई कोठारी, श्याम पाटील, व अभिनंदन विभूते यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दैदीप्यमान कार्यावर प्रकाश टाकला तर देशभूषण व्हसाळे यांनी आभार मानले.
To Top