जागतिक लिंगायत महासभा मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी अमोल म्हमाणे
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुसंख्य लिंगायतांचे वास्तव्य असून ते लिंगायत धर्म तत्त्वांपासून दूर राहतात. त्यांच्यापर्यंत वाचन साहित्य पोहोचवून खरा लिंगायत धर्म समजून घेण्यासाठी तालुकाध्यक्ष अमोल म्हमाणे यांच्या नेतृत्वाखाली युनिट काम करणार आहे. मंगळवेढा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी केले.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळ येथील महादेव मंदिर येथे रविवारी,१० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत जागतिक लिंगायत महासभा, सोलापूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी अमोल म्हमाणे यांची नियुक्ती केली.जागतिक लिंगायत महासभेच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी अमोल म्हमाणे यांची निवड झाल्याचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. समन्वयक विजयकुमार हत्तुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आगामी काळात लिंगायतांनी एकत्र येऊन काम केले, लिंगायत धर्माची तत्त्वे समजून घेतली तरच त्यांना भवितव्य आहे. त्यासाठी लिंगायतांचे कार्य महाराष्ट्रातील सर्व लिंगायतांना एकत्र करण्याचे काम महासभेद्वारे केले जाईल,
असा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुळगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधताना व्यक्त केला. ते या बैठकीस आवर्जून उपस्थित होते.
मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णांचे स्मारक उभारण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना, समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी, महात्मा बसवण्णांच्या नावाने लिंगायतांसाठीचे महामंडळ निर्माण करून स्वायत्त संस्थेचा दर्जा दिल्याने समाजामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचेही सांगितले.
यावेळी महासभेचे उपाध्यक्ष बाबुराव पाटील,शिवशरण गोविंदे, शिवराज कोटगी, शेखर सोड्डी, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव पाटील, ज्येष्ठ नेते शिवशंकर कवचाळे, विनोद पाटील,नागेश पाटील, बसवेश्वर पाटील, संजीव कवचाळे, गणेश बनसोडे, विनोद पाटील, महेश पाटील तसेच पद्माकर बनसोडे, प्रविण कोरे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.