पंढरपूर : मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनी,१ सप्टेंबर रोजी माजी आमदार सावंत यांच्या कार्यालयात जगद्गुरु तुकोबाराया साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रीय अध्यक्ष शिवमती सुमन पवार यांचे हस्ते जिजाऊ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली समाजातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मराठा सेवा संघाची स्थापना केली. प्रारंभी अधिकारी-कर्मचाऱ्यांचं संघटन अशी ओळख असलेल्या मराठा सेवा संघाकडे सर्वत्र क्रियाशील बहुजन चळवळ म्हणून पाहिलं जातंय.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचा ३३ वर्षाचा प्रवास अन् यापुढील वाटचाल यावर चर्चा झाली. संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन कार्यकर्ता शिबिर सुरू करण्याबाबत मनोदय काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष नितीन जाधव सर, तालुका कार्यकारिणीचे सदस्य शिवश्री सतीश रकटे, एम. एन. गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष दिलीप पवार हे हजर होते.