मुंबई : सोलापूर शहर युवती सेनेच्या वतीने शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार आला.
सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या निवासस्थानी सोलापूर शहर युवती सेनेच्या वतीने शहर प्रमुख रेखा आडकी यांनी कोकीळ यांना राखी बांधून औक्षण केले.त्यानंतर सोबत आलेल्या नंदिनी कोंडुर, राधिका मिठ्ठा, साक्षी आळगी, यमुना पिस्का यांनीही कोकीळ यांना राखी बांधली.
यावेळी अनिल कोकीळ कुटुंबीयांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमास आलेल्या सर्व सोलापुरातील पदाधिकारी व शिवसैनिकांना सन्मानित करण्यात आलं.
याप्रसंगी विष्णू कारमपुरी, रेखा आडकी, नंदिनी कोंडुर, राधिका मिठ्ठा, साक्षी आळगी, प्रियंका कनकी, यमुना पिस्का, अनिल कोंडुर, सदानंद पिस्का, सुरेश शिंदे व कोकिळ कुटुंबीय सर्व सदस्य उपस्थित होते.