Type Here to Get Search Results !

सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी बाळे येथे रस्ता रोको

सोलापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलक व ग्रामस्थांवर शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ते १२ वा.दरम्यान सोलापूर - पुणे महामार्गावर बाळे येथे एक तासाचे रस्ता रोको करण्यात येणार आहे. 


मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी सर्वानुमाते निषेधाचा ठराव पारित करून प्रशासनास निवेदन देण्याचे ठरले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळी ११ वा. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि सर्व कक्षांच्या वतीने करण्यात आलं आहे.