Type Here to Get Search Results !

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून दीड कोटींचे वारकरी भवन


सोलापूर : येथील नियोजित वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ १६ सप्टेंबर  २०२३ रोजी जगद्गुरु तसेच पंढरपूर श्री. विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या दिव्य सानिध्यात तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी शनिवारी दिली.
सोलापुरातील वारकऱ्यांची धार्मिक भूक भागविण्याच्या अनुषंगाने अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. पालकमंत्री असताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारकरी भवनासाठी सुमारे एक ते दीड कोटींचा निधी मंजूर केला .या निधीतून दमाणी नगर भागातील जाम मिलमधील सोलापूर महानगरपालिकेच्या आरक्षित दोन एकर जागेतील १० हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये भव्य वारकरी भवन बांधण्यात येत आहे. 
जाम मिलमध्ये महापालिकेच्या आरक्षित दोन एकर जागेपैकी दहा हजार स्क्वेअर फुट जागा वारकरी भवनासाठी निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर माघवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पालकमंत्री असताना आमदार विजयकुमार देशमुख या रिंगण सोहळ्याला उपस्थित होते. 
यावेळी ह .भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी समस्त वारकऱ्यांच्यावतीने सोलापुरात वारकरी भवन असावे, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर वारकरी भवनासाठी आपण जरूर निधी देऊ असे अभिवचन आमदार देशमुख यांनी समस्त वारकऱ्यांना दिले होते. ते वचन पूर्ण करत या वारकरी भावनासाठी एक ते दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतील या वारकरी भवनाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ होत असल्याने आनंद होत असल्याचे सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले. 
शनिवारी दुपारी सुधाकर इंगळे महाराज यांनी जाम मिलमधील महापालिकेच्या आरक्षित जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत ह. भ. प. संजय पवार तसेच अन्य सहकारी वारकरी उपस्थित होते. वारकरी भावनात मोठी श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिकरित्या महाराष्ट्रात सोलापुरातील हे एकमेव वारकरी भवन असल्याचे सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून होत असलेल्या या वारकरी भावनाचा सोलापूर शहरातील लाखो वारकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगत यामुळे वारकऱ्यांचे धार्मिक अधिष्ठान आणखी बळकट होण्यास मदत होणार असल्याचेही सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले.