आमदार सुभाष देशमुख यांचे हस्ते ओपन जिम चे उद्घाटन

shivrajya patra
सोलापूर : येथील अष्टविनायक नगर म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर येथे माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी श्रींची पूजा आमदार सुभाष देशमुख यांचे हस्ते करण्यात आली. 
या कार्यक्रमात विनोद पवार यांनी अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळाकडून लोकमंगल फाऊंडेशनच्या 'अन्नपूर्णा' योजनेसाठी फंड देण्यात आला. 

सोसायटीतील खुली जागेत नंबर दोनवर ओपन जिम बसविण्यात आली होती. हा कार्यक्रम अष्टविनायक सोसायटी व गणेशोत्सव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी  अष्टविनायक नगर चेअरमन विश्वनाथ व्हनकोरे यांच्या हस्ते आमदार देशमुख यांचा सक्तार करण्यात आला. सोसायटी चे चेअरमन विश्वनाथ व्हनकोरे  यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. 

यावेळी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा सत्कार चंद्रशेखर कदम, माजी उपमहापौर राजेश काळे यांचे सत्कार रोहित ढगे, माजी नगरसेविका संगीता जाधव यांचा सत्कार जगदाळे मॅडम, विशाल गायकवाड यांचा सत्कार अभय पवार, बिराजदार यांचा सत्कार गणेश फसफुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोसायटीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी सोसायटीचे सचिव व्यंकटेश वैकुंठे,  खजिनदार सुभाष सदाफुले, ज्येष्ठ संचालक मोहन डांगे, गौरीशंकर जेऊरे, मारुती कटारे, सुनिल सुरवसे,  श्रीमती रेखा गायकवाड, अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ चे अध्यक्ष संकेत सुरवसे, सचिव विनोद पवार, श्रीधर घाळे, जयेश क्षीरसागर, खजिनदार, गणेश चंदेले, चंद्रशेखर कदम, उत्सव अध्यक्ष धनराज जिवनगी, गणेश फसफुले, राम वाघमारे, कार्यक्रम प्रमुख अभय पवार, रोहन बेले, कार्याध्यक्ष सतीश भरमशेटी, दिग्विजय शिंदे, नागेश येरनाळे, लक्ष्मीकांत गायकवाड, सौरभ सुरवसे, रोहित ढगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
To Top