सोलापूर : अक्कलकोट मठाचे मठाधिपती हटगार कोष्टी पिठाचे जगद्गुरू श्री चिक्करेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज हे आज सकाळी लिंगैक्य कर्नाटक येथील लिंगसुर जिल्ह्यातील गुडदनाळ ह्या गावातील त्यांच्या मठात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागात त्याचे लाखोंच्या भक्तगण आहेत.
अक्कलकोट येथील वागदरी रोडला त्यांचा मुख्य मठ आहे. त्याच्या अखत्यारीत जवळपास २०० मठ आहेत, प्रत्येक ठिकाणी समाजाकडून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबिवले जातात. सोलापूर शहरातही त्यांचे निलम नगर, विनायक नगर, आशा नगर, गवळी वस्ती एमआयडीसी, रामवाडी, थोरली इराण्णा वस्ती असे अनेक ठिकाणी महाराजांचे मठ आहेत.
त्यांनी समाजासाठी समाजातील दीन-दुबळ्या भक्तांसाठी आपले आयुष्य खर्चिले. समाज एकसंघ रहावा, ह्यासाठी जिथं-जिथं समाज आहे, तिथे-तिथे त्यांनी मठ बांधून समाजाला एकत्रित ठेवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे.
जगद्गुरू चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या निधनावर अनेकांनी संवेदना व्यक्त केलीय.