Type Here to Get Search Results !

समर्पित भावनेतून कार्य करणारे दादा


एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील,नम्र, मितभाषी, बीएससी ॲग्री होऊन गावचा राजकारणात सक्रिय असणारे प्रचंड अभ्यासू सकारात्मक विचासरणी भविष्याच्या वेध घेत अत्यंत मोठं व्हिजन असलेल्या राजकीय नेत्या चा आज वाढदिवस... !

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवात तशा अठरा पगड जाती वर्षानुवर्ष आनंदाने गुण्यागोविंदाने एकत्रितपणे नांदत आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शेतकरी, शेतमजूर, भटके-विमिक्त, मेंढपाळ-गोपाळ सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारे शंकर नागनाथ येणगुरे उपाख्य दादा मेहनत आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांची फळी, नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देण्याचं लकब, कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम दादांनी नेहमीच केले.

प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक कष्ट करण्याची तयारी कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवायचे कसे याची शिकवण दादांकडून शिकावी.

त्यांनी स्वतः खुर्चीसाठी कधीच राजकारण केलं नाही. मराठा, माळी, धनगर, चर्मकार, अल्पसंख्य, मागास, मातंग इ.समाजातील लोकांना दादांनी सोसायटी ग्रामपंचायत च्या माध्यमातून चेअरमन, सरपंच करून प्रतिनिधित्व दिलं. स्वतःच्या खुर्चीसाठी इतर समाजांचा वापर करून घेणारे मागे वळून इतिहासात पाहिलं की दिसतीलही, पण असा नेता कुणीच नाही. जो इतरांना पदावर सन्मानाने बसवून स्वतः मात्र नि:स्वार्थपणे चालत राहतो.जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या शंकर दादांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

💐🎂💞
ज्योति क्रांती परीषद,
वंचित बहुजन आघाडी. कासेगांव.