सोलापूर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व शिवसेना सोलापूर शहरप्रमुख तथा नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा व क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान सोहळा-२०२३ युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिन संपूर्ण भारत देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हॉटेल सेंटर पॉईंट, सात रस्ता येथे सोलापूर शहर जिल्ह्यातील हँडबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, तलवारबाजी, रायफल शूटिंग, आर्चरी, बास्केटबॉल, स्विमिंग, योगा, टेनिस अशा खेळांमधील १३० गुणवंत खेळाडूंचा राष्ट्रीय,राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सन्मानचिन्ह,फेटा बांधून व पुष्पगुच्छ देवून दिनेश मलपे (विभागप्रमुख-वागळे इस्टेट,ठाणे तथा शिवसेना माथाडी,बांधकाम कामगार महाराष्ट्र अध्यक्ष) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व सोलापूर शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मनोज शेजवाल यांचा वाढदिवस सर्व मान्यवर, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड,महिला आघाडी शहरप्रमुख जयश्रीताई पवार, उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण, संजय सरवदे, युवासेना कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख सुजित खुर्द, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थ मोटे, शिवसेना कामगार आघाडी शहरप्रमुख सायबांना तगेळी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनीषा नलावडे, सुनंदा साळुंके, महिला आघाडी उपशहरप्रमुख अश्विनी भोसले, मार्था आसादे, नीलम अर्जुन, शिवसेना विभागप्रमुख येशू मद्री, युवासेना शहर सचिव समर्थ बिराजदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश अमदिपुर,युवासेना उपशहरप्रमुख पद्मसिंह शिंदे, जनक पारवे, श्रेयस माने, राहुल साळुंके, प्रवीण माने, दिनेश जाधव, रोहित सोनटक्के, निलेश कुंभार, आकाश बल्लोळी, निखिल कुंभार, चिंटू निमगल आदींनी परिश्रम घेतले.