सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे रविवारी ग्राम समृद्धी कार्यशाळा

shivrajya patra
सोलापूर :  सोलापूर सोशल फाउंडेशन आणि जिव्हाळा शेतकी कर्मशाळेच्या संयुक्त विद्यमाने वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे रविवारी, ०१ ऑक्टोबर ग्राम समृद्धी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख भूषवित असल्याचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी सांगितले.
        
१७ सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हा सेवा पंधरवडा साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक डॉक्टर रमेश जारे, समृद्ध गाव अभियान जिल्हा समिती प्रमुख मोहनराव अनपट, कृषीतज्ञ मनोज शहा, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे शिवगुंडे यांची उपस्थिती असणार आहे.

सकाळी ११ वाजता या कार्यशाळेचा प्रारंभ होत आहे. कार्यशाळेला दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिव्हाळा शेती कर्मशाळेचे विश्वस्त डॉ. विलास बालगांवकर, आणि सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केले आहे.
To Top