जिल्हा प्रशासनाचे जाहीर आवाहन
जालना जिल्ह्यात अंतरवली-सराटी येथे मराठा आरक्षणाचे संबंधाने घडलेल्या घटनेवरुन समाज माध्यमांमध्ये येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच समाज माध्यमांवर समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करु नयेत, जेणेकरुन सदर संदेशावरुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
आपल्या जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी आपण सर्वांनी कृपया प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (सोलापूर ग्रामीण), पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने (सोलापूर शहर) यांनी केले आहे.