जुळे सोलापुरात महिलांनी फोडली दहीहंडी

shivrajya patra
 
सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर मध्ये महिलांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते, त्या दहीहंडी उत्सवात जुळे सोलापूर परिसरातील शेकडो महिलांच्या सहभागात अक्षरा कदम हिने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. संभाजी ब्रिगेडचे वतीने तिला विजेते ट्रॉफी प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी मनाली जाधव हिचा महाराष्ट्र राज्य लोकमतच्या वतीने आयकॉन पुरस्कार हा पर्यावरण विभागात मिळाल्यामुळे तिचाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे या दहीहंडीमध्ये सहभाग घेऊन घेर धरला. विविध गाण्यावर नृत्य करून मनसोक्त आनंद लुटला. 

या दहीहंडीमध्ये कर्तबगार महिलांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या, तसेच चंद्रयान तीन यशस्वी महिला शास्त्रज्ञाचे फलक लावण्यात आले होते. अंधश्रद्धा टाळा विज्ञानाकडे वळा, वृद्ध आई-वडिलांचा मायेने संभाळ करा डॉल्बीचा वापर, जातीय सलोखा राखा आदी सामाजिक प्रश्नावर स्लोगन द्वारे प्रबोधन करण्यात आले होते.
To Top