विद्यार्थ्यांनी ते समाज ऋण मानावे : प्रशांत बडवे

shivrajya patra

सोलापूर :  लाभ म्हणून मिळालेले शालेय साहित्य केवळ मोफत मानू नये, विद्यार्थ्यांनी ते समाजाचे ऋण मानावे. ते  मोठे होऊन अशाच गरजूंना परत करावे, असे आवाहन
समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे यांनी केले.

विश्वकर्मा फाउंडेशन, अहिल्यादेवी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, मर्यादित आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर हार्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम भैय्या चौक येथे पार पडला. या प्रसंगी ६० लाभार्थ्यांना शालेय बॅग व इतर साहित्याची मदत करण्यात आली. 

विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड व सचिव रूपेश गायकवाड यांनी स्वखर्चातून ही मदत पुरविली. प्रास्ताविक संतोष गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक व सिनेट सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर होते. 

यावेळी बोलताना सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक व सिनेट सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी विद्यापीठाच्या विविध कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे होते. 

माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी विश्वकर्मा फाउंडेशनच्या मोफत रूग्णोपयोगी साहित्य वाटप उपक्रमाच्या कार्याचा गौरव केला. सर्व मान्यवरांनी गायकवाड परिवार व रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव केला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर हार्मनीचे अध्यक्ष अविनाश मठपती यांनी रोटरीची कार्यपध्दती व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. 

याप्रसंगी रविद्र गायकवाड, आनंद जमदाडे, अप्पा सलगर, राजेंद्र गायकवाड, मल्लिकार्जुन सालोटगी, रोटरी क्लबचे सचिव शिरीष शेळके, डायरेक्टर सुरज राऊत, किरण साळुंके हे मान्यवर उपस्थित होते. 

प्रशांत कोथमिरे, संकेत माने, अरूण धुळे, रेहान शेख, सागर शिंदे, राकेश गायकवाड, श्रीकृष्ण गायकवाड, ओम गायकवाड यांनी परिश्रम घेतले. चंद्रशेखर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. रूपेश गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
To Top