सोलापूर/५ : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, सोलापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर व्यक्तींचे कर्णबधिरत्व तपासण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले बेरा टेस्ट मशीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे हस्ते वैशपंयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
मागील एक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात बेरा टेस्ट मशीन नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींचे कर्णबधिरत्व तपासता येत नव्हते. दिव्यांग विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबविण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ही बाब जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्याशी चर्चा करून ही बेरा टेस्ट मशीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्णबधीर दिव्यांगांच्या तपासणीसाठी उपयोगी व्हावी व कर्णबधिर बांधवांना यु. डी. आय. डी. कार्ड व ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुढाकार घेऊन सदर मशीन 'मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिष्ठाता यांचेकडे सुपूर्द केली. त्याचा लाभ सर्व कर्णबधिर दिव्यांगाना होणार आहे.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन संस्थेचे सचिव शशी भूषण, सहसचिव शिवाजी जाधव, दिव्यांग विभाग प्रमुख सच्चिदानंद बांगर तसेच राजकुमार पाटील, रामचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.