सोलापूर : गेल्या सात वर्षापासून आस्था रोटी बँक ६८ लिंग पदयात्रेतील ३०० भाविकांना फराळीचे प्रसाद वाटप करण्यात येते. समाजाचं ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी सांगितले.
रविवारी, ०३ सप्टेंबर रोजी दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटना आणि आस्था रोटी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानुभव मंगल कार्यालयात चतुर्थीच्या अनुषंगाने व श्रावण मासानिमित्त ६८ लिंग पदयात्रेतील भक्तांना उद्योजक बसवराज सावळगी, आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव सुहास छंचुरे, राजेंद्र जंगम, संगमेश्वर माळगे, वेदांत तालिकोटी, रौफ सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत फराळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसादामध्ये केळी, वेफर्स, शाबू चिवडा, बटाटा चिवडा, शेंगा लाडू ,चहा इत्यादी प्रसादाचा भक्तांनी आस्वाद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद सावळगी,
पिंटू कस्तुरे, बसवराज बेऊर,सुरज छंचुरे, उदय छंचुरे, प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले.