निधन वार्ता
गब्रुवान आवताडे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बिरोबा वस्तीतील ज्येष्ठ नागरिक गब्रुवान प्रभू आवताडे यांचे रविवारी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यू समयी ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली, सुना - नातवंडे असा परिवार आहे.
सोमवारी सकाळी ९ वा. बिरोबा वस्ती येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ते त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वपरिचित होते.
मालनबाई जाधव
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील श्रीमती मालनबाई महादेव जाधव यांचे वृद्धापकाळात रविवारी, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले, त्या मृत्यूसमयी ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर कासेगाव मधील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्या सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जाधव यांच्या त्या मातोश्री होत.