जिल्ह्यात पर्यावरण पुरक गणेशोत्सव निमित्त १६ सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम: सिईओ मनिषा आव्हाळे

shivrajya patra

माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशन चा उपक्रम

सोलापूर/१४ : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व माझी वसुंधरा अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन करणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा परिषदेत सिईओ यांचे दालनात पत्रकारांशी वार्तालाप करताना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी, पर्यावरण पुरक गणेशोत्सव संपुर्ण जिल्ह्यात साजरा करणेत येत असल्याचे सांगितले. गणेश चतुर्थी पुर्वी स्वच्छता श्रमदान मोहिमेनिमित्त विविध उपक्रम राबविणेत येत आहेत. दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छतेची शपथ व प्रभात फेरी काढणेत येणार आहे.


तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या सहभागाने स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता श्रमदान मोहिमेची जनजागृतीसाठी प्रभात फेरी सर्व ग्रामपंचायतीमध्ये काढण्यात यावी. प्रभात फेरीद्वारे स्वच्छता श्रमदान मोहीमेमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात यावे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्वच्छता श्रमदान मोहीम घेणेत येणार आहे.


ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक जागेच्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविणेत यावे. ग्रामपंचायतीमधील घरांच्या जवळील जागेमध्ये कचरा आढळून येत असेल तर सदर कचरा काढणे अथवा जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी सदर कुटुंबाची असणार असल्याबाबत गावातील कुटुंबाना सुचित करण्यात यावे.


ज्या मार्गाने गणेश मुर्तीचे आगमन होणार आहे. अशा सर्व मार्गावर सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे अस्तित्व असेल तर तेथे स्वच्छता श्रमदान मोहीम राबविणेत यावी. गणेशोत्सव कालावधीत व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टीक बंदी करण्यात यावी. तसेच प्रभातफेरी माध्यमातून प्लास्टीक बंदी बाबत गावात जनजागृती करावी.


तालुक्यातील निवडण्यात आलेल्या सार्वजनिक जागा त्या ठिकाणी कचरा टाकला जातो अशा ठिकाणी श्रमदान मोहीमे अंतर्गत स्वच्छता करुन घेण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
To Top