सोलापूर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असून शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या अशा संकट काळात शासनाने सोलापूर जिल्ह्यास दुष्काळ जाहीर करावा, ह्या प्रमुख मागणीसोबत आणखी सहा मागण्यांचे निवेदन सोमवारी, भारत राष्ट्र समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सौ. शमा पवार यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारत राष्ट्र समिती असून यंदा गरीब शेतकऱ्याला दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढं आलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, अशी भारत राष्ट्र समितीची भूमिका आहे. या प्रश्नी शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी बोलताना देण्यात आला.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते नागेश वल्याळ, सचिन सोनटक्के, जयंत होले-पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यांच्यासमवेत अनिल बर्वे, तुकाराम शेंडगे, आनंद देशमुख, सुरज डवले, प्रकाश मरगल, अजित सोनकटले, मोहसीन शेख, हाजी शाहनवाज शेख, करीम सैय्यद, अखलाक माशालकर, अश्रफ शेख, अझहर नदाफ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.