सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीत बाळे, आसरा चौक, मार्केड यार्ड येथे रविवारी, ०३ सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेचे तसेच सकल मराठा समाज समन्वय पक्षाचे वतीने जालना येथे झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ येथे आंदोलन करण्यात आले असून ४९ आंदोलनकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.