चौत्रा पूना नाका तरुण मंडळाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस मोठ्या लेझिम ताफ्यासह जल्लोषात प्रारंभ

shivrajya patra

सोलापूर : चौत्रा पूना नाका तरुण मंडळाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस  मान्यवरांच्या शुभहस्ते श्रींच्या  पूजनाने करण्यात आली. पांरपरिक हलगी, ताशा, संबळच्या गजरात १००० पेक्षा अधिक युवकांचा लेझिम ताफा आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी सहभागी झालाय. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी  शेकडो श्री गणेश भक्तांसह माता भगिनीही मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, शिवसेना शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, मराठा समन्वयक माऊली पवार, संभाजी आरमार संस्थापक श्रीकांत डांगे, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष मतीन बागवान, संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उद्योजक अहाद शेख, समाजसेवक शाहू सलगर, बसवराज कोळी आदींसह शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांना मानाचा फेटा बांधून मार्गदर्शक आशुतोष बरडे, मार्गदर्शक समर्थ बरडे, अध्यक्ष रोहित सुरवसे व कार्याध्यक्ष योगेश खटके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

त्रिशूळ महादेव पिंड रुपात कृत्रिम फुलांनी सजवलेल्या आकर्षक मिरवणूक रथावर श्री बाप्पा विराजमान झाले आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० वर्षेपूर्तीनिमित  छत्रपति श्री शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्तीसोबत घोड्यावर स्वार असलेल्या मावळ्यांचा देखावा  करण्यात आला आहे. हा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
To Top