शेकडो मुस्लिम युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

shivrajya patra

सोलापूर : शहरातील मुस्लिम पाच्छा पेठ परिसरातील सोलापूर महानगरपालिका जुने प्रभाग क्रमांक १४ मधील शेकडो मुस्लिम युवक निष्ठावंत शिवसैनिक इम्तियाज दर्जी यांचा नेतृत्वाखाली शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. 

केंद्र व राज्यातील भाजपा रुपी सरकार गोरगरीबांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक उपक्रम व योजना आपल्या मुख्यमंत्री कारकीर्दीत काम केले. जातियवाद नाहीसा केला म्हणून महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव शिवसेना ठाकरे पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्याच धर्तीवर सोलापुरातील प्रभाग क्रमांक १४ मधील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
 

पद्मशाली चौक येथील शिवसेना शहर कार्यालयात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना ठाकरे पक्ष सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इम्तियाज दर्जी यांच्या नेतृत्वाखाली सर्व मुस्लिम बांधवांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला.

यावेळी शहरप्रमुख विष्णु कारमपुरी, इम्तियाज दर्जी, इस्माईल मगलूर, नबु मणियार, मशीर बागवान, सैफअन शेख, इब्राहिम बहादुर, अंबादास गायकवाड, महबूब जामाद, अमीर दर्जी, गफ्फार शेख, इमरान मुजावर, अल्ताफ दर्जी, वसीम दर्जी, शाहिद सय्यद, मोहीम कोतवाल, शाहरुख बहादुर, आसिफ शेख, अल्ताफ दर्जी, हबीब शेख, मुदस्सर दर्जी, जफर मगलूर, अफसर सय्यद, अजहर शेख, मुनाफ शेख, मोहसीन सय्यद, सलीम महाजन, विश्वजीत गायकवाड, बशीर अमीर दर्जी, मोहम्मद कलबुर्गी, कलील बडेपीर, सलीम शेख कार्यालयप्रमुख विठ्ठल कुराडकर, विभाग प्रमुख सुरेश शिंदे,  विभाग प्रमुख प्रशांत जक्का, गोवर्धन मुदगल, रमेश चिलवेरी, पप्पू शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शेकडो मुस्लिम कार्यकर्ते प्रवेश प्रसंगी विष्णू कारमपुरी, इम्तियाज दर्जी यांच्यासह मुस्लिम बांधव दिसत आहेत.
To Top