सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासना मार्फत घेण्यात येणारा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेला सोलापूर जिल्ह्यातून ४९ केंद्रातून एकूण २४, ८५१ विद्यार्थी बसल़ेले आहेत. ०४ व ०५ ऑक्टोबरपासून एलिमेंट्री परीक्षेसाठी १३,४१४ विद्यार्थी आणि ०६ व ०७ इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी ११,४३७ विद्यार्थी असे एकूण २४,८५१ विध्यार्थी परीक्षेसाठी फार्म भरलेले आहेत. यात वस्तूचित्र , स्मरणचित्र, संकल्प (डिझाईन) व भूमिती अक्षरलेखन असे विषय असल्याचे शैक्षणिक कलाशिक्षक संघ, सहसचिव शांतप्पा काळे कळविले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त सिल्वर ज्युबिली हायस्कूल बार्शी केंद्र क्र. १०९००४या १७२० विद्यार्थी तर सोलापूर शहरातून इंडियन मॉडेल स्कूल केंद्र क्र .१०९०४० येथून ८९४ विद्यार्थी बसलेले आहेत.'जिल्ह्यातून २४,८५१ चित्रकला ग्रेड विद्यार्थी परीक्षा देतात, परंतु हे पेपर जमा करायला धाराशिवला जावे लागते.
२०१५ पासून सोलापूर येथे मुल्यमापन केंद्र व्हावे, म्हणून प्रयत्न करत आहोत. तसे कलासंचालनालय मुंबई यांना पत्र दिले आहे. काडादी चित्रकला महाविद्यालय, व कला व्यावसाय केंद्र असूनही सोलापूर जिल्ह्यातील कलाशिक्षकांना धाराशिवला जावे लागते. तरी काडादी चित्रकला महाविद्यालय, किंवा कला व्यावसाय केंद्र येथे मुल्यमापन केंद्र व्हावे, असे कलाशिक्षकांचे मत असल्याचे शैक्षणिक कलाशिक्षक संघ, सहसचिव शांतप्पा काळे म्हटले आहे.