संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

shivrajya patra
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीनिवास पाटील व खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.

'मराठी मातीच्या संघर्षाचा इतिहास' घराघरात पोहोचविणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्या जीवनात भगवान गणपती बाप्पा सुख समाधान आणि आनंद देवो, हीच प्रार्थना ! या शब्दात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा दिल्या.

To Top