सोलापूर/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय, दक्षिण सोलापुर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर प्रवर्गातील नागरिकांसाठी टाकळी ग्रामपंचायत येथे एकदिवसीय शिबीर घेण्यात आले.
यामध्ये जवळपास १०० नागरिकांचे मतदार नोंदणी व दुरुस्ती, ३० ते ४० नागरिकांना नविन दुबार शिधापत्रिका शिबीरात देण्यात आल्या. ४० ते ५० लोकांचे अर्ज तयार झाले असून लवकरच त्यांनाही दुबार शिधापत्रिका मिळणार आहेत.
यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंडल अधिकारी जे. डी. पवार, तलाठी प्रदिप जाधव, पुरवठा अव्वल लिपिक शिंदे यांच्यासह महसुलचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
टाकळीचे सरपंच भौरम्मा कोळी, उपसरपंच सिद्धाराम घोडके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी, सुभाष बगले, मंगल मोरे, जयश्री घोडके, कस्तुरा दुधभाते, दोड्डप्पा अणची, सागर कलशेट्टी, प्राजक्ता साबळे, रेखा बिराजदार व टाकळीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्या ग्रामस्थांना जवळपास दशका-दोन दशकानंतर
नविन शिधापत्रिका मिळाल्या, त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान दिसत होते. शिबीराचे प्रास्ताविक चंद्रशेखर गायगवळी यांनी केले. दत्तात्रय गायकवाड यांनी शिबीराचे उद्देश सांगितले. शिबीर यशस्वी करण्यासाठी नागरिकांसह सिद्धाराम घोडके व चंद्रशेखर गायगवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.