बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत शिक्षक दिन साजरा

shivrajya patra
सोलापूर : येथील कुमठा नाका, मुमताज नगरातील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक इरफान चौधरी होते.

दिव्यांग विद्यार्थी शिक्षक लक्ष्मण म्हेत्रे, समर्थ राऊत, विद्यार्थीनी शिक्षिका मेहराज कोथिंबीरे यांनी इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. यावेळी संस्था सदस्य श्रीनिवास इटकर, शामराव वाघमारे, सौ. सालपे  यांची प्रमुख अथिती म्हणून उपस्थिती होती.
 
शिक्षक दिनानिमित्त संस्था सचिवा लक्ष्मीबाई इटकर, संजीवकुमार इटकर, अरविंद कुलकर्णी, सुरेश इटकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन भगवान चौगुले तर शिवाजी कांचने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी दिकोंडा, इक्बाल जमादार, श्रीनिवास पवार, सानिया पटेल, मदिहा मुल्ला, बिबीजान, नाईकवाडी, उमर शेख, समरसिंग जुणी, उमेश परिट यांनी परिश्रम घेतले.
To Top