मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात 'जमात' ची बैठक फिस्कटल्याने पुणेरी पाहुण्यांना 'सोलापुरी' पाहुणचार

shivrajya patra


सोलापूर : संसार तिथं भांड्याला भांडे लागतचं, त्यातून कौटुंबिक कुरबुरी आणि त्यापुढे जाऊन वाद-विवादही होतात. या सामान्य समजूतीच्या पुढे जाऊन घडलेल्या घटनेत एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी एका विवाहितेचा माहेरच्या मंडळींनी दोन वेळा गर्भपात केला. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 'जमात' ची बैठक बसली. त्या जमातमध्ये त्यावर तोडगा निघण्याऐवजी 'बाचाबाची' चा आलेख वाढत गेल्याने जावयासह पुणेरी पाहुण्यांना सोलापुरी पाहुणचार दिला. ही घटना नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरात दिड वर्षापूर्वी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री, जवळपास २४ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक महिती की, येथील कुमठा नाका, विजय नगर केंगनाळकर विट भट्टीजवळ रहिवासी असलेले फुलमाडी कुटुंबिय सध्या व्हिजन ९ मॉलच्या मागें लेबर कॅम्प, पिपळे सौदागर, पुणे येथे वास्तव्यास आहे. त्या परिवारातील मुलीचा निकाह वाकड हिजेवाडी रोड, भुजबळ वस्ती वाकड येथील रहिवासी आदम रियाज शेख याच्याबरोबर झाला होता. त्याच्या पत्नीला ३ महिन्यांचे दिवस गेल्यावर, एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून २ वेळा गर्भपात झाल्याच्या आरोपामुळं फूलमाडी आणि शेख कुटुंबियांत वाद होऊन मतभेद वाढले होते.

त्यावर तोडगा काढण्यासाठी गतवर्षी, ०५ मार्च सायंकाळी आदम शेख याच्या पत्नीच्या आजोबाच्या घरी शोभादेवी नगरात 'जमात' बसली होती. त्या बैठकीस आदमचे आई-वडील आणि नातलग असे ८ जण पुण्याहून आले होते. जवळपास पाच-पन्नास साक्षीने जमलेल्या 'जमात' मध्ये मौलानाने आदम आणि कुटुंबास मजहबी डोस देताना, औरों जैसी हरकत क्यूं करते हो म्हटले.

त्यावर आदम 'मुझे बताओ, मेरी बिवी का दो बार क्यु गर्भपात किया, मेरे बच्चे को क्यु मारा' अशी विचारणा करीत होता. त्यावर त्याच्या सासऱ्यांने दरवाजाला कडी लावण्यास सांगितले. आज तुम्हाला जीवंत सोडणार असे म्हणत 'पुणेरी' पाहुण्यांना 'सोलापुरी' पाहुणचार केला. या मारहाणीत आदमचे वडील रियाज शेख जबर जखमी झाले. त्यांना रूग्णाल्यातही दाखल करण्यात आले.

गतवर्षी, ०५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. घडलेल्या घटनेसंबंधी आदम रियाज शेख याने काल रात्री, ०५ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याचे सासरे-सासू, मेहुणा, पत्नी आणि अन्य २० जणांविरुद्ध फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार ज्ञात-अज्ञात २४ आरोपींविरूध्द भादवि १२० (ब), ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि साळुंखे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top