Type Here to Get Search Results !

जल्लोषमय वातावरणात सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धांचा समारोप

 सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्या व अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रिडा स्पर्धा - २०२३ आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा सांगता समारोह पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे मंगळवारी, मोठ्या जल्लोषमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रभारी अधिकारी, शाखा प्रभारी अधिकारी, अंमलदार व पोलीस कुटुंबीय यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये सोलापूर विभाग, पंढरपुर विभाग, बार्शी विभाग, व पोलीस मुख्यालय असे चार संघ सहभागी झाले होते. सांघीक खेळामध्ये कबड्डी, खो-खो, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल या खेळाचा समावेश असून वैयक्तीक खेळामध्ये अॅथेलेटिक्स, स्वीमिंग, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती, वेटलिफ्टींग इ. खेळाचा समावेश होता.
बेस्ट अॅथलेक्टिस् पुरुष- पोशि/समीर पठाण, बेस्ट अॅथलेक्टिस् महिला - मपोशि/ माशाबी शेख, सांघीक सर्वसाधारण विजेतेपद- पोलीस मुख्यालय, पुरुष १०० मीटर धावणे- प्रथम अस्लम शेख, व्दितीय निखिल टिळे, पुरुष रिले (४१०० व ४०० ) - प्रथम विजेता संघ- सोलापूर विभाग, व्दितीय- पोलीस मुख्यालय, महिला रिले (४१००) - प्रथम विजेता संघ- पोलीस मुख्यालय विभाग, व्दितीय- सोलापूर विभाग तसेच मल्लखांब प्रात्यक्षिकाकरिता भारत हायस्कुल, जेऊर करमाळा येथील विद्यार्थी यांनी नेत्रदिपक प्रात्यक्षिक दाखवले. 
क्रिडास्पर्धेच्या अनुषंगाने पोलीस पाल्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा प्रकारात अर्थव म्हडी, आबिद शेख, कुर्री, मस्के, अंजली शिंदे, सिध्दी माळी, जिना पटेल यांनी पारीतोषीक पटकावले. 

पंच अॅथलेटीक्स म्हणुन राजू पॅटी, आयान पटेल यांचे योगदान लाभले. सर्व विजेत्यांना पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्या हस्ते बक्षिस देऊन कौतुक करण्यात आले. तसेच क्रीडा समारोप दरम्यान ध्वज हस्तांतरण करण्यात आले.

सदरच्या क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या सर्व खेळाडू यांना पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी मार्गदर्शन करून त्यांना पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा यशस्वी खेळाडूंची निवड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये होणार आहे.

जिल्हा पोलीस किडा स्पर्धेचा सांगता समारोहाचे प्रस्तावना अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, आभार प्रदर्शन पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री यांनी केली. रा.पो. नि. प्रकाश शिंदे यांनी संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पाडल्या. या सोहळ्याचे सुत्रसंचालन पोउपनि तांबोळकर शाखा सो. ग्रा, यांनी केले.