सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा पोपल वस्ती येथील विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुशील सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सुमित शिवशरण, सागर उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल गाडे होते.
या वेळी अशोक चंदनशिवे, आकाश चंदनशिवे, अतुल गेजगे, दिनेश आयवळे, सचिन केंगार, रशिद शेख, गणेश गेजगे, स्नेहल सोनवणे, जयकुमार धडे, कपिल सुरवसे, विनायक चंदनशिवे, राजरत्न गायकवाड, वैभव बिराजदार,शिव कोळी आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि .प. शाळेच्या सहशिक्षिका वैशाली कार्वेकर,ज्योती उंबरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.