सोलापूर : जिल्ह्यात ODF plus ला गती देण्यासाठी राबविणेत येणारे विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व जिल्हयात सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम हाती घेणेत आली होती. ३२५७ पेक्षा अधिक सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी शनिवारी सुट्टीचे दिवशी बैठक घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी सक्त सुचना दिलेल्या आहेत. हरघर जल गाव घोषीत करताना जलस्त्रोतांची स्वच्छता पाहिली जाते.
सोलापूर जिल्ह्यात जलस्त्रोतांची संख्या ९७५६ असून या मधील जवळपास ३२५७ पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता करणेत आली. या बरोबर टीसीएल ठेवणेचे जागा देखील स्वच्छ करणेत आल्या आहेत. ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब असलेले ठिकाणी पावसामुळे वाढलेले गवत, कचरा हटविण्याचे काम या अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम घेणेत आली.
शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील गोपाळपूर येथे जल सुरक्षक व ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी यांनी स्वच्छता केली. करमाळा व मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व बार्शी या तालुक्यात उत्स्फूर्तपणे स्त्रोतांची स्वच्छता केली आहे. जलसुरक्षक तसेच प्रशिक्षित पाणी नमुने घेणारे महिला भगिनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. हातात कुदळ-फावडे, पाटी घेऊन स्वच्छता कर्मचारी यांनी परिसराची स्वच्छता केली.
या विशेष अभियानासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात वाॅर रूम करणेत आली आहे. गेल्या दहा दिवसापासून या मोहिमेची तयारी करणेत आली होती. प्लास्टिक निर्मूलन अभियानास मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर जलस्त्रोत स्वच्छता मोहिमेस आज ग्रामस्थ व कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला.
जिल्हा कक्षातून आज जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे , प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, सनियंत्रण सल्लागार यशवंती धतुरे या संपर्क अधिकारी यांचेसह सर्व बीआरसी व सीआरसी , यांनी गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली या मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येक तालुक्यात ही मोहिम यशस्वी करण्यात आली.
स्वच्छता कर्मचारी यांनी टाक्या केल्या स्वच्छ केलेले आहेत. या जलस्त्रोताच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थ व कर्मचारी सहभागी होत आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे साठी जलस्त्रोताचे परिसर स्वच्छ केलमुळे जलस्त्रोत बाधीत होणार नाही. याची काळजी घेणेचा उद्देश्य या अभियानाचा आहे. गावात जलस्त्रोताचे बाजूस कुठल्याही प्रकारे कचरा किंवा घाण त चे सांडपाणी त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. श्रमदानातून ही मोहिम हाती घेणेत येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात हातपंप, विहीरी, पाण्याच्या टाक्या, आदी जलस्त्रोताचा परिसराची स्वच्छता करणेत आली. या बाबत जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणाल्या, जिल्ह्यात ९७३० जलस्त्रोत आहेत. याची वर्षातून दोनवेळा स्वच्छता केली जाते. या विशेस स्वच्छता मोहिमेत पाण्याच्या टाक्या बरोबर जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ करणेत आला. या जलस्त्रोताची नियमित रासायनिक व जैविक तपासणी केली जाते.
फोटो ओळी :
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे विहिरींचे परिसराची स्वच्छता करताना कर्मचारी व ग्रामस्थ छायाचित्रात दिसत आहेत.