सोलापूर : सोलापूर शहरातील प्रमुख रस्ता असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकपर्यंतचा रस्ता (जिजाऊ मार्ग) ताबडतोब दुरुस्ती किंवा नूतनीकरण करा, अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने श्री संभाजी महाराज चौक (जुना पुना नाका) येथे रास्ता रोको आंदोलन करणार अशा मागणीचे व इशारा वजा निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
या निवेदनात सोलापूर शहरातील प्रमुख मार्ग असलेला जिजाऊ मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री संभाजी महाराज चौक हा रस्ता फार खराब झालेला आहे, हा मार्ग हे सोलापूर शहराचं प्रवेशद्वार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात श्रावण मासातील विविध उत्सव, नवरात्र उत्सव दसरा, दिवाळी हे सार्वजनिक उत्सवाचे मिरवणुका व शहरातील उत्सव प्रिय भाविक भक्तांचे व नागरिकांचे मोठी वर्दळ, बाजारपेठांचे वर्दळ दररोज असतो, परंतु हा रस्ता फारच खराब झाल्याने अपघात होत आहेत.
वाहने व पायी चालणाऱ्यांचे कठीण झाले आहे, तरी वरील रस्ता ताबडतोब दुरुस्ती करावे किंवा नवीन रस्ता करावे, अशी मागणी सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे, अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, उपशहर प्रमुख सुरेश जगताप, लहू गायकवाड, आबा सावंत, अनिल कोंडुर, शिवाजी कोळी, नाना मोरे, शहरप्रमुख रेखा आडकी, शहर कार्यालय प्रमुख विठ्ठल कुराडकर, वेंकटेश नंदाल, जर्गीस मुल्ला, रमेश चिलवेरी, गोवर्धन मुदगल, साक्षी आळगी, प्रियंका कनकी, गुरुनाथ कोळी, संभाजी कोडगे, नागार्जुन कुसुरकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.