Type Here to Get Search Results !

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'गोकुळ' चे मार्गदर्शन

सोलापूर : गोकुळ शुगरचे ऊस विकास अधिकारी अमित दाडगे व ऊस पुरवठा अधिकारी सुभाष राठोड यांनी तामलवाडी गटातील एकरुख, कासेगांव, कासारी, ऊळेगांव, ऊळे, तामलवाडी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊस पुरवठा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

गोकुळ शुगर हा वजन काटा व दराच्या बाबतीत शेतकरी साठी फायदेशीर असल्याचे सुभाष राठोड व दाडगे यांनी सांगितले. नवीन प्रजाती ऊसाची संदर्भात पुढील वर्षी कारखाना पुरवठा करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल, या गावभेटीमुळे शेतकरी वर्गात आंनदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बाजार समिती संचालक शंकरराव येणगुरे यांनी ऊस पुरवठा करण्यासंदर्भात नक्कीच सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी बाजार समिती संचालक शंकरराव येणगुरे, उपसरपंच शंकर वाडकर, माजी सरपंच नेताजी पाटील, कासेगाव सोसायटी चेअरमन श्रीशैल भोज, संजय जाधव, अप्पाराव पाटील, शहाजहान शेख, जयपाल वाडकर, नाना स्वामी, ग्रामपंचायत सदस्य रामहरी चौगुले, सचिन गरड, योगीराज भोज, दत्ता वाडकर, शिवदास वाडकर, संजय पवार यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.