Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत हर्षवर्धन हायस्कूलचे यश

कासेगांव/प्रतिनिधी : लोकमंगल महाविद्यालय वडाळा येथे पार पडलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये प्रशालेतील १०० मीटर धावणे या गटामध्ये कु. आरोही प्रदीप पाठमास हिने द्वितीय स्थान मिळवले, तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावत हर्षवर्धन हायस्कूल, तळे हिप्परगे च्या शिरपेचात मानाचा तुरा खोचत घवघवीत यश मिळविले.

२०० मीटर धावणे गटात कुमारी ऐश्वर्या कांबळे यांनी द्वितीय क्रमांक त्याचप्रमाणे ४०० मीटर धावणे गटात  ऐश्वर्या कांबळे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ६०० मीटर धावणे या गटात कुमारी जिया बाबू पठाण हिने द्वितीय क्रमांक तसेच सुमया पैगंबर शेख हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१०० x ४ रिले  या संघातील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. भालाफेक  या गटात सानिया मुलाणी हिचा तृतीय क्रमांक आला.लांब उडी या गटात सानिया मुलाणी व रेणुका बिदावत यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. क्रॉस कंट्री या गटात प्रथमेश जाधव व समर्थ जाधव यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक प्राप्त केला असून या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. 

या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील सहशिक्षक सुरेश शिंदे, श्रीमती मीरा माने यांच्यासह सर्व खेळाडूंचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.