Type Here to Get Search Results !

बहुजन युवक लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली : संतोष माळी


कासेगाव/प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर  तालुक्यातील कासेगांवमधील वंचित बहुजन समाजातील धनगर, गुरव, परिट समाजातील युवकांचा लवकरच पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा कासेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष माळी भोजने यांनी दिली.

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा कमिटी व राज्य कमिटी उपस्थित राहणार असल्याचंही संतोष माळी यांनी स्पष्ट करून हा टर्निंग पॉईंट प्रस्थापितांच्या राजकीय सारीपाटाला एक आव्हान ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

सध्या कासेगाव ग्रामपंचायत निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बहुजन समाजातील वंचित तरूण वर्ग वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेत आहे. वंचित घटकातील प्रत्येक समाजाला निवडणुकीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे वंचितचे सोलापूर जिल्हा संघटक उस्मान शेख यांनी म्हटलंय.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष संभाजी गाजरे, युवा जिल्हा महासचिव अमोगी तेलंग, तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, तालुका महासचिव सचिन जाधव, ज्योती क्रांती परिषदेचे जिल्हा प्रवक्ता प्रा. रणजीत जाधव, तालुका उपाध्यक्ष सुहास जाधव, ज्योती क्रांती परिषदेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश कांबळे, कासेगांव चे शाखाध्यक्ष ऋषी म्हेत्रे, उपाध्यक्ष नागेश क्षीरसागर, शाखा उपाध्यक्ष विष्णू जाधव, शाखा उपाध्यक्ष सागर गायकवाड, शाखा महासचिव शिवानंद जाधव, कार्याध्यक्ष संजय जाधव, सह कार्याध्यक्ष सहदेव कांबळे, संघटक बालाजी हजारे, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.