Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड


जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम ची उत्तुंग भरारी

सोलापूर : युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल  व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेतली. जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियमच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


शालेय क्रीडा  स्पर्धा पुणे विभाग यांच्या सौजन्याने लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूल वडाळा येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केले. त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

१४ वर्ष वयोगट :
आकांक्षा शिंदे या विद्यार्थिनींनी ६.९० मीटर गोळा फेक आणि १४.१० मीटर थाळी फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. वैभवी कुंभार हिने गोळा फेक या स्पर्धेमध्ये ५.२० मीटर गोळा फेकुन तृतीय क्रमांक पटकाविला. श्रीनिवास राठोड याने लांब उडी या स्पर्धेमध्ये ३.५४ मीटर उडी मारून प्रथम क्रमांक मिळविला. श्रेया भोसले हिने ३.०० मीटर उडी मारून तृतीय क्रमांक मिळविला.

१७ वर्षे वयोगट :
सानिका चौगुले हिने थाळी फेक या स्पर्धेमध्ये १५.४७ मीटर थाळी फेकून प्रथम क्रमांक मिळवला.
 १९ वर्ष वयोगट :
नेहा मिसाळ या विद्यार्थीनीने थाळीफेक या स्पर्धेमध्ये १३.२० मीटर थाळी फेकून प्रथम क्रमांक व गोळा फेक या स्पर्धेमध्ये ५.८५ मीटर गोळा फेकून द्वितीय क्रमांक  मिळवला. स्नेहा साठे या विद्यार्थिनीने ११.४० मीटर थाळी फेक या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. युवराज कांबळे या विद्यार्थ्यांने १७.९० मीटर थाळी फेकून द्वितीय क्रमांक मिळविला. दिव्या काटवटे या विद्यार्थिनीने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. समीक्षा ननवरे या विद्यार्थिनींनी लांब उडी या स्पर्धेमध्ये ३.०५ मिटर उडी मारून तृतीय क्रमांक मिळविला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये यशाच्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक विद्यार्थी असतात, परंतु यश मिळविणारे मात्र कमी असतात. जिजाऊ ज्ञान मंदिरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या या सर्व यशस्वी खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा प्रचंड यश मिळावं, असं अभिष्टचिंतन केले. 

आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. विद्यार्थ्यांना सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी चांगले शिक्षक रुपी पंखच असावी लागतात, त्याशिवाय कोणताही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेऊ शकत नाही. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख-लाख शुभेच्छा या शब्दात प्राचार्य सुषमा निळ यांनी शुभेच्छा दिल्या. 

सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा सर्व शिक्षकांनी दिल्या.सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप भोसले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्य सुषमा निळ, मुख्याध्यापिका तेजश्री कुलकर्णी, प्राध्यापिका औरादे व प्रा. वैभव मसलकर यांच्यासह शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.