Type Here to Get Search Results !

शासकीय वाहन निर्लेखनाकरीता पाठवा ०६ सप्टेंबरपर्यंत निविदा


सोलापूर : जिल्हा समादेशक , होमगार्ड, सोलापूर हे त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन शासकीय वाहन टाटा ट्रॅुप कॅरिअर ४०७ निर्लेखनाकरीता निवीदा मागवीत आहेत. हे वाहन पाहणीकरिता जिल्हा समादेशक होमगार्ड सोलापूर, पत्ता–शासकीय आय. टी. आय. च्या मागील बाजूस जिल्हा सैनिक बोर्ड मुलांचे वसतीगृहाशेजारी  सुंदरम नगर, सोलापूर  येथे उभे असून कार्यालयीन वेळेत वाहन पाहता येईल. 

यासाठी सीलबंद निवीदा दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यंत जिल्हा समादेशक, होमगार्ड सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले आहे. सदर वाहन कार्यालयीन आवारात उभे आहे. सदरच्या सीलबंद निवीदा दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत उघडण्यात येतील. त्याच दिवशी मंजुर निवीदेनुसार वाहन कार्यालयातून नेण्याची व्यवस्था स्वखर्चाने करण्यात यावी.

निर्लेखित यंत्रसामग्रीचा तपशील –टाटा ट्रॅुप कॅरिअर ४०७, वाहन क्रमांक एम.एच. १३ पी. ०१२० हा आहे.  पुरवठा वर्ष सन २००५ हे आहे.   नग -१ , मेक मॉडेल – टाटा ट्रॅुप कॅरिअर ४०७, अंदाजित किंमत रू. ९०.००० /  टिप – वरील निर्लेखित यंत्र सामग्री जसे आहे तसे या तत्वावर विक्री करावयाची आहे.  लिलाव मंजुर झाल्यास लिलावाची किंमत तात्काळ भरावी लागेल, त्याशिवाय यंत्रसामग्री हलविता येणार नाही.

यंत्रसामग्रीची  योग्य किंमत आल्यास जिल्हा समादेशकांचे हुकुमावरून लिलाव मंजूर करण्यात येईल. लिलावात यंत्रसामग्रीची किंमत कमी आल्यास लिलाव रद्द करणेचा अधिकार अध्याक्षांना राहिल आणि यंत्रसामग्रीची विक्री केल्यानंतर यंत्रसामग्री स्वखर्चाने घेऊन जावी लागेल.  यंत्रसामग्रीच आरसी ही परिवहन विभाग यांचे कडून रद्द झाली असल्याने सदर वाहन रस्त्यावर वापरता येणार नाही  याची नोंद घ्यावी, असेही जाधव यांनी कळविले आहे.