Type Here to Get Search Results !

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची ११ सप्टेंबरला बैठक

सोलापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी, ११ सप्टेंबर २३ रोजी  सकाळी ११.३० वाजता सभागृह क्र. १ विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याचे उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव भ्रष्टाचार निर्मुलन समिती, पुणे यांनी कळविले आहे.

सदर बैठक सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येणार असून, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत मागील तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.