Type Here to Get Search Results !

भगवान चौगुले यांना बदलीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप

उस्मानाबाद/ संजय पवार : येथील स्वामी समर्थ मूकबधिर शाळा, उस्मानाबाद येथील विशेष शिक्षक लेखक, कवी भगवान चौगुले यांची बदली उस्मानाबाद येथून सोलापूर येथील बालाजी मूकबधिर शाळा येथे झाल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात दिव्यांग विभागाचे प्रमुख भारत कांबळे, अशोक उमाप, बालाजी नादरगे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शाल बुके देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

यावेळी बालाजी नादरगे यांनी भगवान चौगुले यांच्या दहा वर्षाच्या सेवा कालातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याचा आढावा घेतला. भगवान चौगुले यांनी दिव्यांगासाठी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांच्या या कार्याची महाराष्ट्र शासनाने ही दखल घेत संस्थेला सामाजिक पुरस्कार दिला आहे, याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करीत सोलापूर येथेही अशीच सेवा त्यांच्या हातून घडो, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात मला जे भरभरून यश सन्मान मिळाले. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा आशिर्वाद असल्याचे यावेळी सत्काराला उत्तर देताना चौगुले यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले. यावेळी जगदीश सुरवसे, एस. एन. न्यूज चॅनेलचे संपादक शकिल शेख, शहाजी चव्हाण, बालाजी लोमटे यांनी शाल बुके देऊन सेवा कालाचा गौरव करीत चौगुले यांच्या नवनियुक्तीच्या सेवाकालास अभिष्टचिंतन केले.

याप्रसंगी अर्जुन गरड, जुनेद शेरीकर, गणेश साळुंके, बालाजी शिंदे, मोगलाजी गायकवाड, रमेश जाधव, चंद्रकांत दसाडे, नागनाथ जाधव, बालाजी जाधवर तसेच जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक उपस्थित होते़. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीआण्णा  यांनी परिश्रम घेतले.