सोलापूर : युवक संचालनालय पुणे विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधील १४ वर्षे वयोगटातील मुलांनी रोमहर्षक विजय पटकाविला.
बलदवा देगाव प्रशाला विरुद्ध जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यामध्ये झाला. साखळी सामन्यात दुसरा सामना हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये झाला. जिजाऊ च्या खेळाडूंनी दुसरा सामना एकतर्फी जिंकला. बारा गुण घेत जिजाऊ चा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये येऊन पोचला. उपांत्य पूर्व फेरीतील हा सामना बलदवा देगाव प्रशाला व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम यांच्यामध्ये झाला.
उपांत्य पूर्व फेरीतील हा सामना जिजाऊ च्या संघाने तीन गुणांनी जिंकून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. जिजाऊ इंग्लिश स्कूल मधील खेळाडू जाधव प्रवीण, मुलाणी सरफराज, खंदारे पार्थ, नीळ शिवतेज, गुंड यश, राठोड सुमित, जाधव अमित, राठोड राहुल, घडमोडे सार्थक, निराळे धीरज, राठोड श्रीनिवास, सुतार संस्कार.
विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांनी रोमहर्षक विजय पटकाविला. MIT जूनियर कॉलेज केगाव विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय,कोंडी यांच्यामध्ये झाला. या सामन्यांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील खेळाडूंनी एमआयटी ज्युनिअर कॉलेज केगाव यांच्यावर दहा गुणांनी विजय मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयमधील खेळाडू कांबळे युवराज,शिंदे केदार,तरटे क्रिश,व्यवहारे वैभव,पवार देवा, वानी समर्थ,कांबळे पृथ्वीराज,धावणे सुनील,काकडे संभाजी, नागणे विशाल,पंडित सूरज,सुरवासे प्रणव. या सर्व खेळाडूंनी विजयाची परंपरा कायम राखली असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सर्व यशस्वी खेळाडूचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ आणि प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका तेजश्री कुलकर्णी, अर्चना ओरादे, वैभव मसलकर, क्रीडा शिक्षक दीपक भोसले यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले.