Type Here to Get Search Results !

... माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी 
माहिती अधिकार  कार्यशाळेचे आयोजन

सोलापूर : जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या उपक्रमाविषयीची अचूक माहिती योग्य वेळी व प्रभावीपणे प्रसारित केली जाण्यास चालना मिळावी व माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत अभिप्रेत असलेल्या अधिकारांचा वापर कसा करावयाचा याबाबतचे प्रबोधन तसेच कायदेशीर व तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी समाज कल्याण केंद्र, रंगभवन, सोलापूर येथे करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी यांनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.

             या कार्यशाळेत माहिती अधिकार कायद्याची पार्श्वभूमी आणि आंतरराष्ट्रीय इतिहास कायद्याची उद्दिष्टे, माहिती अधिकार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, कलम एक ते ३१ मधील सविस्तर माहिती, कलम चार मधील महत्त्वाच्या तरतुदी, अर्ज, अपील, शास्ती व नुकसान भरपाई यांची सविस्तर माहिती सदर कार्यशाळेत देण्यात येणार आहे. आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा पुणे) चे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार, माहिती अधिकार कायद्याचे सुप्रसिध्द लेखक बापूराव बनसोडे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, ग्रंथमित्र कुंडलीक मोरे तर अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.