Type Here to Get Search Results !

सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांना सदस्य म्हणून द्यावी संधी : देवेंद्र औटी

सोलापूर : राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते, साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक देवेंद्र औटी यांनी केली आहे. राजकीय पर्यावसन म्हणून कुणाची हि वर्णी लावू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शरद गोरे हे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई (बुद्रुक) चे भूमिपुत्र असून ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९३ साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे वीस हजार सभासद असून आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनं विविध ठिकाणी आयोजित केली आहेत. 

नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगांव मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा समावेश आहे. त्यांनी आजवर १० ग्रंथाचे लेखन केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला 'बुधभूषण' हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. 

युगंधर प्रकाशन या संस्थेने ते संपादक व प्रकाशक असेलेल्या संस्थेने आजवर १४४ पुस्तके प्रकाशित केली आहेत.
त्यांनी लेखक दिग्दर्शक व संगीतकार म्हणून पाच चित्रपट व एक नाटक केले आहे, ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, प्रेमरंग, उषःकाल, एक प्रेणादायी प्रवास सूर्या ऐतवी, फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे.

उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्रास सुपरिचित आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांवर हजारो व्याख्याने दिली आहेत. सोलापूर शहरात साहित्य परिषदेने अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. 

त्यानंतर अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या आयोजित केले आहे. या संमेलन आयोजनात साहित्य परिषदेचे शहराध्यक्ष या नात्याने मी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. या बाबी विचारात घेऊन साहित्यिक शरद गोरे यांना सदस्य विधान परिषदेवर सदस्य म्हणून संधी द्यावी, असे ज्येष्ठ साहित्यिक देवेंद्र औटी म्हटले आहे.