चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले डॉ. अभिजित वाघचवरे; व्हिएतनाम मधील फु-कॉक मध्ये पार पडली स्पर्धा

shivrajya patra

सोलापूर : प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनी व्हिएतनाम देशातील फु कॉक या बेटावरील आयर्नमॅनची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. स्विमिंग, सायकलींग आणि रनिंग अशा तीन स्तरावरील ही स्पर्धा त्यांनी पूर्ण करून चौथ्यांदा आयर्नमॅनचा खिताब मिळवणारे सोलापूरमधील पहिलेच स्पर्धक ठरले. 


पहिल्यांदा सन 2019 मध्ये गोवा, दुसर्‍यांदा सन 2024 मध्ये इटलीमध्ये फूल्ल आयर्नमॅन आणि तिसर्‍यांदा सन 2026 च्या सुरूवातीला ओमान मध्ये आयर्नमॅनची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर सन 2026 च्या नोव्हेंबर मध्ये व्हिएतनामध्ये त्यांनी चौथ्यांदा आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये जगभरातील 800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


रविवारी पहाटे थंड वातावरणात दक्षिण चीनच्या समुद्रात 2 कि. मी. स्विमिंग करून लगेच समुद्राच्या किनारी असलेल्या रोलिंग रोडवरील 90 किलोमिटर सायकलींग 3 तास 10 मिनिटात पूर्ण केले त्यानंतर 21 किलोमिटर रनिंग ऊन वार्‍यांचा सामना करत 07 तास 18 मिनिटात पूर्ण करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत ही स्पर्धा पूर्ण करून चौथ्यांदा आयर्नमॅनचे मेडल पटकावले.


डॉ. अभिजित वाघवरे यांनी अनेक मॅराथॉन मध्ये सहभाग घेत अनेकांना प्रोत्साहीत केले आहे. शरीत तंदुरूस्त आणि मन प्रसन्न ठेवून ही कठोर स्पर्धा पूर्ण करण्यासाठी परिवाराकडून चांगली मदत मिळते पत्नी डॉ.राजश्री ही स्वतः मॅरेथॉन रनर आणि सायकलीस्ट आहे तसेच बंधू दंतरोग तज्ञ डॉ. सत्यजित वाघचवरे हेही मॅरेथॉन रनर आणि सायकलीस्ट आहेत.


नियमित व्यायामातून हे साध्य करता येते यासाठी आपला व्यवसाय सांभाळून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व सहकारी, मित्र तसेच वाघचवरे परिवाराकडून नेहमी प्रेरणा आणि मदत मिळते असे डॉ. अभिजित वाघचवरे यांनी सांगितले.

To Top