प्रा. डॉ. मोहम्मद शफी चोबदार यांना ‘मौलाना अब्दुल माजिद दर्याबादी जागतिक उर्दू दिन पुरस्कार’ जाहीर

shivrajya patra


सोलापूर : उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच शैक्षणिक, साहित्यिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. मोहम्मद शफी चोबदार यांना उर्दू डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने जागतिक स्तरीय ‘मौलाना अब्दुल माजिद दर्याबादी जागतिक उर्दू दिन पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 09 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील गालिब अकादमीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. 


डॉ. चोबदार यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे सोलापूरच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.



या पुरस्काराबद्दल सोलापूर उर्दू घरचे सदस्य महमूद नवाज, उर्दू घरचे माजी व्यवस्थापक राजा बागवान, कार्यकारी व्यवस्थापक तथा ग्रंथपाल साहिर नदाफ, मोहम्मद आयाज, डॉ. हारून रशीद बागवान, डॉ. सुमय्या बागवान, सर्फराज बलोलखान, अब्दुल मजीद शेख, सोशल महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आसमान खान, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मुश्ताक शेख, शमा एज्युकेशन सोसायटीचे अय्युब अहमद नल्लामंदू, इंडियन यूथ असोसिएशनचे मजहर अल्लोळी, जाफर बांगी, रोटरी ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागबान, नूर ट्रस्टचे अध्यक्ष नूर मुन्शी, प्रा. डॉ. सदफ आरा चोबदार आणि कादिर हुसेन चोबदार यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


डॉ. चोबदार यांना मिळालेला हा सन्मान सोलापूरच्या उर्दू भाषा, साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरत असल्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली.

To Top