सोलापूर : 'संघर्षातून उत्कर्षाकडे' असा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या स्व. हरिश्चंद्र फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 2026/27 या वर्षासाठीचे प्रतिष्ठीत 'राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार' जाहीर करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यभरातील निवडक विभूतींना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव कृष्णा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संस्थेचे संस्थापक सचिव कृष्णात गायकवाड
कला, शिक्षण, साहित्य, समाजसेवा, कृषी, सहकार, उद्योग, पत्रकारिता आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या गुणीजनांचा गौरव व्हावा, या उद्देशाने दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन केले जाते.
जाहीर झालेले पुरस्कार खालीलप्रमाणे
01) जीवनगौरव पुरस्कार
भरतकुमार मोरे (उपसंपादक, दै. पुण्यनगरी, सोलापूर)
डॉ. अनिता अमोल चौधरी (महावितरण अभियंता, कल्याण)
सुरेश बन्सीधर वाघमारे (परभणी)
भागवत विठ्ठल पांढरे (भोसे)
बॉस्को मायकेल डिसुझा (बांद्रा, मुंबई)
रामचंद्र प्रभाकर वारगड (धाराशिव)
गजानन चव्हाण (पुसद, यवतमाळ)
वंदना सावंत (सांगोला)
गणेश कालिदास लटके (बाभुळगाव, पंढरपूर)
02) शिक्षणरत्न पुरस्कार
सोनाली प्रवीण माने (सोलापूर)
पांडुरंग विष्णू लामतुरे (कुरूल , मोहोळ)
जयश्री दुर्योधन मराठे ( दक्षिण सोलापूर)
प्रा. दादासाहेब महादेव मदने (सोनके, पंढरपूर)
राहील अहमद अश्फाक अहमद (बदलापूर)
विद्या विलास पाटील (एसपी पब्लिक स्कूल, नांदोरे, पंढरपूर)
श्रीम. शांतिदूत ननावरे (मुंबई)
शाहिस्ता सिद्दीकी (मुंबई)
स्मिता नरसिंह कल्याणकर (जि. प. प्रा. शाळा करकंब, पंढरपूर)
शितल अभिमन्यू निमकर (लोकरे वस्ती शाळा, करकंब, पंढरपूर)
स्मिता शशिकांत पोतदार (जिल्हा परिषद उजनी वसाहत शाळा, करकंब)
भरत सुखदेव ननवरे (जिल्हा परिषद प्राथमिक हराळे वस्ती शाळा, करकंब, पंढरपूर)
रमेश खारे (करकंब, पंढरपूर)
इंद्रजीत मधुकर महामुनी (गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय, गोतंडी, इंदापूर, )
अमीर अकबर पठाण (विवेकवर्धिनी विद्यालय, पंढरपूर)
सलीम वल्लीसाहेब मासूलदार (सोलापूर)
दिपाली भरत भोसले (मुंबई)
सीमा राजेश आबनावे (बदलापूर)
जयश्री भगवान कांबळे (शहापूर, ठाणे)
सुवर्णा कल्याण नलवडे (महिला मंडळ प्राथमिक शाळा, पंढरपूर)
03) कलारत्न पुरस्कार
अनिल सुरजुसे (अकोला)
दीपक ज्ञानोबा सुतार (करकंब, पंढरपूर)
संतोष साटविलकर (मुंबई)
दयानंद जगताप (डोंबिवली)
गणेश बबनराव मास्कर (मलकापूर, बुलढाणा)
सोमनाथ दादा शिंदे (मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाशी, नवी मुंबई)
रुपेश मोहन जाधव (पालघर)
शाळीग्राम रतन पाटील (डोंबिवली)
रवी स्थूल (अमरावती)
गणेश ठसाळ (दहिसर, मुंबई)
मनुजा मनोज साळगावकर (मुंबई)
04) प्रेरणाज्योती पुरस्कार
छाया अरविंद मिश्रा (मुंबई)
मारुती रेड्डी हिरापल्ली (निलंगा, लातूर)
राधिका जाधव (सोलापूर)
अनुजा अनिल उरुणकर (ईश्वरपूर, सांगली)
उमा कृष्णदेव इंगळे (पोलीस पाटील, शेगाव दुमाला, पंढरपूर)
नीता येवले (ईश्वरपूर, सांगली)
वंदना निकम (राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर, कल्याण)
शबनम समीर दफेदार (बालस्नेहालय फाउंडेशन, पुणे)
05) समाजदर्पण पुरस्कार
महादेव कमल नारायण कोळी (श्रीपूर, माळशिरस)
शेखर आत्माराम सावंत (रत्नागिरी)
नितीन मधुकर क्षीरसागर (विवरे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव)
आनंदा निंगाप्पा कांबळे (समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, कोल्हापूर)
राहुल श्रीकांत दीक्षित (पटवर्धन कुरोली)
जुबेर युनूस बागवान (बार्शी)
अमित उतेकर (बृहन्मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग)
06) समाजभूषण पुरस्कार
गोरख मारुती जानकर (तरंगफळ, माळशिरस, सोलापूर)
जितेंद्र चव्हाण (अभियंता, सानपाडा, नवी मुंबई)
07) अन्य विशेष पुरस्कार
साहित्यदर्पण पुरस्कार: प्रा. बाळासाहेब लिंबाजी भडकवाड (खैरेवाडी, माढा)
कृषिरत्न पुरस्कार: मोहन गहिनीनाथ वाळके (पांढरेवाडी)
वृत्तदर्पण पुरस्कार: विजय यादव (संपादक, डोंबिवली)
आदर्श प्रशासक पुरस्कार: जमीर युसुफ काझी (मुख्य शेती अधिकारी, धाराशिव सहकारी साखर कारखाना)
उद्योगरत्न पुरस्कार: दत्तात्रय बबन यादव (पंढरपूर)
सहकाररत्न पुरस्कार: संदीप मोरे (बृहन्मुंबई शिक्षक सहकारी बँक, मुंबई)
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, 20 डिसेंबर रोजी सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असल्याचेही माहिती गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
*****





