पत्रकार संजय निंबाळकर यांची सुकन्या त्रिशा हिच्या 05 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

shivrajya patra

दसूर : येथील पत्रकार संजय निंबाळकर यांच्या सुकन्या चिमुकली त्रिशा संजय निंबाळकर हिचा  05 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांकडून त्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.



लहान मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक वाढदिवस हा कुटुंबासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. त्रिशाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच विविध आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी चिमुकल्या त्रिशाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, उज्ज्वल भविष्य आणि शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश मिळावं, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी भारत चव्हाण, शंकर चव्हाण, प्रवीण चव्हाण, ओम चव्हाण, निखिल वारे, विजयकुमार चव्हाण आणि पत्रकार अतुल सुरवसे यांनी त्रिशाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत तिच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.


चिमुकल्या त्रिशाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि आनंदाने संपूर्ण सोहळ्याला विशेष रंगत आली. तिच्या आयुष्यात आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य आणि यश सदैव नांदो, हीच सर्वांकडून सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

****

To Top