सोलापूर : फिरदोस महिला शिक्षण व समाज संस्था संचलित चांदतारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर मध्ये शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र व गोष्टींचे पुस्तकांचे वाचन केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची माहिती विद्यार्थ्यांनी खूप छान सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून लायब्ररीला पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काझी हबीबा तर नेहा बागवान यांनी आभार मानले.

